swiming.jpg 
मराठवाडा

उदगीर : तलावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : हणमंतवाडी (देवर्जन) ता. उदगीर येथील तीन चिमुकले गावालगत असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असता दोघांचा तलावातील गाळात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे.

याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हणमंतवाडी (देवर्जन) ता. उदगीर येथे गावालगत पाझर तलाव आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तलाव भरला आहे. या तलावातील गाळ काढण्यात आल्यामुळे जागो जागी खड्डे सुद्धा पडले होते. म्हशी चारण्यासाठी या भागात दररोज अनेक लहान मुले ही जात असतात. मात्र गुरुवारी हनमंतवाडी येथील इंद्रजीत अंतेश्वर माचोळे (वय-१२), गोविंद बोयणे (वय१२) व नागेश बळीराम माचोळे (वय१४) हे पोहण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास तलावात गेले.

तलावात पोहत असताना यातील दोघे गाळात अडकले. तर नागेश माचोळे हा बाहेर येण्यात यशस्वी ठरला. त्याचे दोन मित्र दिसत नसल्याने तो घाबरून गावात पळत येऊन त्या ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थानी तलाकडे जाऊन पाहिले असता ते दोघेही तलावात असल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांचा शोध घेऊन दोघांना बाहेर काढले व तात्काळ देवर्जन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणुन दाखल केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंद्रजित माचोळे याचा मृत्यू झाल्याचे सांगितले तर गोविंद बोयणे याच्यावर प्राथमिक उपचार करुन उदगीरला हलविले. मात्र उदगीरच्या सामान्य रुग्णालयात जाईपर्यंत त्याचाही मृत्यू झाला होता अशी माहिती देवर्जन बीट जमादार किशन शेळके यांनी दिली आहे.


देवर्जन हनमंतवाडीत शोककळा...

दोन चिमुकल्यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याने देवर्जन हनुमंतवाडी या दोन गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती कळताच बीट जमादार श्री शेळके यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व आकस्मित मृत्यू नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; अनेक कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT